Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Partur News : दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढला; विजेचा जोरदार झटका बसल्याने एकाचा मृत्यू

Jalna News : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे तार तुटणे व खांब वाकले आहेत. त्यानुसार परतूर ताल्यक्यातील लोणी गावात विद्युत प्रवाहात बिघाड झाला होता

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी खांबावर चढलेल्या एका जणाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या परतूर तालुक्यात घडली आहे. उच्च दाबाची विद्युत तार असल्याने सदर व्यक्ती खांबावरच चिटकला होता. यात त्याचा मृत्यू झाला आहे. मृताला खांबावरून खाली उतरविण्याचे काम सुरु आहे. 

जालन्याच्या परतुर तालुक्यातील लोणी गावात सदरची दुर्दैवी घटना घडली असून यात शिवाजी यादव (वय ५०) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे तार तुटणे व खांब वाकल्याचे प्रकार घडले आहेत. त्यानुसार परतूर ताल्यक्यातील लोणी गावात विद्युत प्रवाहात बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्ती करताना सदरची घटना घडली आहे.

उच्च दाबाची विद्युत वाहिनी 

महावितरणच्या उच्चदाबाची वाहिनी असलेल्या विद्युत पोलवर बिघाड झाला असल्याने विजेचा फॉल्ट काढण्यासाठी शिवाजी यादव हे महावितरणच्या पोलवर चढले होते. यावेळी विद्युत प्रवाह सुरूच होता. यामुळे काम करताना त्यांचा स्पर्श विद्युत तारेला झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर व्यक्ती हा महावितरणचा कर्मचारी नसल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान पावसामुळे जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेची समस्या जाणवत आहे. त्या दुरुस्तीसाठी पोलवर चढल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महावितरणला याबाबत माहिती दिल्यानंतर विजेचा प्रवाह बंद करून मृतदेह खाली उतरविण्याचे काम करण्यात येत आहे. या घटनेने लोणी गावासह परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT