Akola : अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले जीवन; २० हजार रुपयांच्या कर्जफेडीच्या विवंचनेत उचलले टोकाचे पाऊल

Akola News : एक एकर कोरडवाहू इतकी शेती आहे. यातून उत्पन्न घेत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणा व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : निसर्गाचा लहरीपणाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. पावसाळ्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायची विवंचना लागून असते. यातून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतात. याच प्रमाणे बाळापूर तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जफेडीच्या विवंचनेत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

अकोल्याच्या बाळापुर तालुक्यातील ग्राम निमकर्दा येथील अल्पभूधारक शेतकरी देवानंद सुखदेव इंगळे (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. देवानंद इंगळे यांच्याकडे एक एकर कोरडवाहू इतकी शेती आहे. यातून उत्पन्न घेत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणा व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळाले नाही. 

Akola News
Chopda Accident : अनियंत्रित बसने दुचाकीसह पायी चालणाऱ्यांना उडविले; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

तीन वर्षांपासून होते २० हजाराचे कर्ज 

सदर शेतकऱ्याकडे सेवा सहकारी सोसायटीचे तीन वर्षापासून २० हजार रुपये कर्ज थकीत होते. दरम्यान यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व कर्जमुक्त होता येत नसल्याच्या देवानंद इंगळे हे चिंतेत होते. सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  

Akola News
Groundnut Crop : अवकाळीचा फटका; भुईमूगाच्या शेंगाना जमिनीतच फुटले अंकुर

कर्जफेड करता येत नसल्याने ते सतत चिंताग्रस्त राहायचे. यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे शेतकऱ्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. या शेतकऱ्याला एक मुलगा व एक मुलगी असून शासनाने शेतकरी आत्महत्या अंतर्गत या शेतकऱ्याला मदत करावी; अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com