Jalna Corporation Saam tv
महाराष्ट्र

Jalna Corporation : अवैध नळ कनेक्शन धारकांविरोधात आता थेट फौजदारी गुन्हे; जालना महानगरपालिकेला इशारा

Jalna News : जालना शहरात तब्बल ३० ते ३५ हजार अनाधिकृत नळ कनेक्शन असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली. त्यांचा शोध घेण्याची मोहीम राबविली जात असून कारवाई करण्यात येणार

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: महापलिकडून पाणी पुरवठा केला जात असताना याकरिता नळ कनेक्शन दिले जातात. मात्र काही जण अधिकृत नळ कनेक्शन न घेता अवैधपणे नळ जोडणी करून घेत असतात. अशा अवैध नळ कनेक्शन धारकांविरोधात महापालिका आता ऍक्शन मोडवर आली आहे. त्यांचा शोध घेऊन कारवाई करत थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. 

जालना शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांविरोधात जालना शहर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. आजपासून अनाधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीमला सुरुवात होणार आहे. जालना शहरात तब्बल ३० ते ३५ हजार अनाधिकृत नळ कनेक्शन असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली. त्यांचा शोध घेण्याची मोहीम राबविली जात असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दहा पथकांद्वारे घेणार शोध 

दरम्यान शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी महापालिकेने मोहीम राबवत आहे. या कामासाठी एका खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून १० पथकांमार्फत अनाधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेतला जाणार आहे. हे पथक शहरातील वेगवेगळ्या भागात परिसरात फिरून शोध घेणार आहे. यानंतर या नळ कनेक्शन धारकांना नोटीस बजावत दंड आकारण्यात येणार आहे. 

तर थेट फौजदारी गुन्हा 

अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन वापर करणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधिताला नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटीस दिल्यापासून शहरातील नागरिकांनी सात दिवसाच्या आत १० हजार रुपये इतकी रक्कम भरून अधिकृत नळ कनेक्शन करून घ्यावे. अन्यथा पाणी चोरीसह मनपाच्या मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कडक इशारा आयुक्तांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; १५ गावांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

SCROLL FOR NEXT