Nishigandha Flower Farming : निशिगंधा फुलाच्या शेतीतून वर्षाकाठी घेताय चार लाखापर्यंत उत्पन्न; मावळच्या साळुंब्रे गावातील शेतकऱ्याचा प्रयोग

Maval News : भात, कांदा, ज्वारी असे अनेक पिके घेतात. मावळ परिसर भात शेती करीता प्रसिद्ध आहे. मात्र आपण वेगळे काहीतरी करायला पाहिजे; म्हणून त्यांनी ४५ गुंठ्यांत निशिगंधा या फुलाचे शेती करण्याचे ठरविले
Nishigandha Flower Farming
Nishigandha Flower FarmingSaam tv
Published On

मावळ : पारंपरिक शेती पद्धतीला बगल देत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास तसेच वेगवेगळ्या पिकातून प्रयोगशील शेती केल्यास उत्पनात वाढ होत असल्याचे नेहमीच पाहण्यास मिळते. त्यानुसार मावळच्या साळुंब्रे गावचे शेतकरी रितेश राक्षे या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या वडिलोपार्जित दोन एकर शेती पैकी ४५ गुंठ्यात निशिगंधा फुलाचे पिकाची लागवड केली. यातून वर्षाकाठी तीन ते चार लाख रुपयाचे उत्पन्न घेत आहेत.

मावळच्या साळुंब्रे या गावातील रितेश राक्षे यांच्याकडे वडिलोपार्जित दोन एकर जमीन आहे. त्यात भात, कांदा, ज्वारी असे अनेक पिके घेतात. मावळ परिसर भात शेती करीता प्रसिद्ध आहे. मात्र आपण वेगळे काहीतरी करायला पाहिजे; म्हणून त्यांनी ४५ गुंठ्यांत निशिगंधा या फुलाचे शेती करण्याचे ठरविले. त्यानुसार सर्वप्रथम जमीन सपाटीकरण केले. त्यावर सरी पद्धतीने निशिगंधा बीजाची लागवड केली. 

Nishigandha Flower Farming
Buldhana Crime : वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बंधून ठेवत लांबवीले दागिने

तीन टप्प्यात केली लागवड 

मात्र निशिगंधाचे फुल यायला सहा महिन्याचा कालावधी लागतो. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन या निशिगंधातून मिळू शकते, ४५ गुंठ्यात वर्षकाठी औषध फवारणी, बीज लागवड याचा खर्च वजा केला असता तीन ते चार लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे. निशिगंधाची लागवड तीन टप्प्यात केली आहे. ४५ गुंठ्यात तीन टप्पे केल्याने फुले वर्षभर काढणीस येतात. यामुळे जवळपास सर्व सीजनमध्ये फुल तोडणी करून विक्रीसाठी नेता येत आहे.

Nishigandha Flower Farming
Tiger Death : विदर्भात १४ दिवसात ६ पट्टेरी वाघांचा मृत्यू; उपासमारीसह मृत्यूची वेगवेगळी कारणे आली समोर

गणपती, दिवाळीत ५०० रुपयांपर्यंत भाव 

दरम्यान याकरिता घरातील सर्व कुटुंब निशिगंधाची फुले काढत असल्याने मजुरी वाचते. गणपती, दिवाळी या सणात विशेष निशिगंध फुलाला मागणी असते. या सणाच्या दरम्यान ४०० ते ५०० रुपये प्रति किलोने फुले विकली जातात. आता थंडीचे दिवस चालू आहे. त्यामुळे आता चाळीस रुपये किलो प्रमाणे फुले विकले जातात. तरी देखील निशिगंधा फुलांची शेती परवडत असल्याचे शेतकरी राक्षे सांगत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com