Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक बिनविरोध; कट्टर विरोध आले एकत्र

Jalna News : राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे, भाजपचे बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे भाऊ भास्कर दानवे एकाच गाडीत

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत (Jalna) जिल्ह्यातील सर्वच राजकीय कट्टर विरोधक एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालंय. या सर्वांनी ठरवून निवडणूक (Election) बिनविरोध करण्याचा निर्णय घेत १६ जागा बिनविरोध करून आणल्या आहेत. (Breaking Marathi News)

राज्यात ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. या निकालात अनेकांना धक्का बसला आहे. याच दरम्यान जालना जिल्हा बँक निवडणुकीची देखील लगबग सुरु आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अर्ज माघार घेण्याची आज शेवटची तारीख होती. जिल्हा बँकेच्या (Bank) १७ जागांसाठी तब्बल दीडशे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तविली जात होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कट्टर विरोधक एकत्र 

जालना जिल्हा बँकेच्या निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांची पुढाकार घेतला होता. त्यामुळं सर्वच राजकीय कट्टर विरोधक एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळाले. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे, भाजपचे बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे भाऊ भास्कर दानवे एकाच गाडीत दिसून आले आहे. एकूण १७ जागांपैकी १६ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित एक जागाही बिनविरोध येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: चालताना पायाचे तळवे का दुखतात? काय आहेत कारणं?

Fake Police Fraud: खाकी वर्दीला भ्रष्टाचाराचा विळखा, पोलीस दलात वेतन घोटाळा; बोगस पोलिसांच्या नावे कोट्यवधींवर डल्ला

Maharashtra News Live Update: आंबोली महादेवगड येथील खोल दरीत पर्यटक कोसळला

Curry Leaves Benefits : केसगळती ते डायबेटिस...रोज कढीपत्ता खाल्ल्यानं होतील ६ जबरदस्त फायदे, वाचा

Sunetra Pawar : जनाची तरी लाज बाळगा; सुनेत्रा पवारांवर टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसवर शिंदे कडाडले

SCROLL FOR NEXT