Jalna Rain Saam tv
महाराष्ट्र

Jalna Rain : जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; वडाळा गावातील घरावरील पत्रे उडाली

Jalna News : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या वादळाने मोठे नुकसान झाले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे

जालना : राज्यात मान्सूनचे सुखद आगमन झाले आहे. मात्र पहिल्या पावसाची सुरवात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह होत असते. यामुळे पहिल्या पावसातच मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. दरम्यान जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वडाळा गावात घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

जालना (Jalna) जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या वादळाने मोठे नुकसान झाले असून या वादळात अनेकांचे घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. जाफराबाद तालुक्यातील वडाळा गावाला वादळाचा सर्वाधिक फटका बसला. या गावातील अनेक कुटुंबांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे संसार आता उघड्यावर आले आहेत. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. 

वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र (Rain) पावसाळ्याच्या तोंडावर घरांची पडझड झाल्याने आमचे संसार उघड्यावर आले असुन शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी; अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबांयांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025 : 'हम साथ साथ हैं' ते 'जिगरा'; लाडक्या बहिणीसाठी प्लान करा मूव्ही डेट

Swollen veins in hands: हाताच्या नसा फुगलेल्या दिसत असतील तर सावध व्हा; 'या' 6 आरोग्याच्या समस्या असण्याची शक्यता

ओला - उबर सोडा, आता सरकारी टॅक्सीतून फिरा, कमी दरात उत्तम सेवा; पहा कुठे अन् कधी सुरू होणार?

Maharashtra Live News Update: पुण्यात पाणी वापरावर मर्यादा यावी यासाठी महापालिका आयुक्ताचा निर्णय

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर महावतार नरसिंहाने मारली बाजी; 'सैयारा', 'धडक २' आणि 'सन ऑफ सरदार २'चा गेम ओव्हर

SCROLL FOR NEXT