Jalna News
Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna: पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती; महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : ग्रामपंचायत कार्यालय शिरसगाव वाघरूळ अंतर्गत येणाऱ्या बोरगाव परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील विद्युत प्रवाह गेले पाच ते सहा महिन्यांपासून खंडित केला आहे. यामुळे गावात पाण्याची समस्‍या आहे. यामुळे त्रस्‍त महिलांनी ग्रामपंचायत (Gram Panchayat) कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. (Jalna News womens Handa Morcha)

एकीकडे राज्य टँकरमुक्त झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र दुसरीकडे भोकरदन तालुक्यातील गृप ग्रामपंचायत शिरसगाव वाघरूळ अंतर्गत येणाऱ्या बोरगाव खडक येथील दलित वस्तीवरील महिलांना मात्र पाण्याच्या पाण्यासाठी भर पावसात भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत (Jalna) कार्यालय शिरसगाव वाघरूळ अंतर्गत येणाऱ्या बोरगाव परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील विद्युत प्रवाह गेले पाच ते सहा महिन्यांपासून महावितरणकडून (MSEDCL) खंडित करण्यात आला आहे. याबाबत महिलांनी ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कुठलीच कारवाई केली जात नाही. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्च्या काढला.

रिकाम्‍या खुर्चीला निवेदन देत दिला इशारा

यावेळी महिलांनी निवेदनही देण्याचा प्रयत्‍न केला. मात्र ग्रामपंचायत कार्यालयात कुणीच उपस्‍थीत नसल्याने महिलांनी रिकाम्या खुर्चीला आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन सात दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पंचायत समिती कार्यालयावर हंडा घेऊन कार्यालयात निरदर्शने करण्याचा इशारा ही या महिलांनी लेखी निवेदनात दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

Rohit Pawar News | बारामती सहकारी बॅंकेतून 500च्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

SCROLL FOR NEXT