Jalna Farmer Saam Tv
महाराष्ट्र

Jalna: ३८ हजार रुपये दे नाहीत तर मर, वसुली एजंटकडून बळीराजाचा छळ; संतापजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

Jalna Farmer: जालन्यामध्ये फायनान्स कंपनीने शेतकऱ्याचा छळ केल्याची घटना घडली. शेतकऱ्याने कर्ज घेतले होते त्याची वसुली करण्यासाी फायनान्स कंपनीने शेतकऱ्याचा छळ केला.

Priya More

राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. यंदा चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. शेतात उभी पीकं करपून गेली आहेत. बँकांकडून आणि फायनान्स कंपनीकडून घेतले कर्ज फेडायचे कसले असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांना त्रास देणं सुरू आहे. जालन्यामध्ये ३८ हजार रुपयांच्या कर्जासाठी शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीने छळ केला. पैसे नाहीत तर मर असं वसुली एजंट शेतकऱ्याला म्हणत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

जालन्यात मायक्रो फायनान्सच्या वसुली एजंटनी अक्षरशः निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. अंबड तालुक्यातील शेतकऱ्याचा ३८ हजार रुपयांच्या कर्जासाठी छळ मांडलाय. शेतकऱ्याला फोन करत धमकी देत पैसे नसतील तर मर असं उर्मट उत्तर दिल्याचा आरोप शेतकऱ्यानं केला आहे. सरकारला जाऊन सांगा दुष्काळाचं आम्हाला सांगू नका असं म्हणत शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जातेय.

या शेतकऱ्याने मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे ४ हप्ते थकले होते. यामुळे कर्जाच्या वसुलीसाठी कंपनीच्या एजंटनी तगादा लावला. या एजंटनी फोन करून शेतकऱ्याला कर्जाच्या वसुलीसाठी छळ केला. याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. साधारण महिनाभर पूर्वीची ही क्लिप असल्याची माहिती मिळत आहे. ज्यात शेतकऱ्याने महिला एजंटला आपल्याकडे दुष्काळामुळे विष खायला पैसे नसल्याचे म्हटलंय.

मात्र तिकडून फायनान्स कंपनीच्या महिला आणि पुरुष एजंटकडून शेतकऱ्याला पैसे नसतील तर जीव देण्याची भाषा केली जात आहे. अंबड तालुक्यातील चिंचखेड येथील शेतकऱ्याने २ वर्षांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून हे कर्ज घेतलं होतं. दरमहा २७५ रुपयांप्रमाणे त्याने आतापर्यंत ३२ हप्ते भरले असून फक्त ४ हफ्ते बाकी असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून अशा प्रकारचा तगादा लावला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: लग्नसमारंभ आणि सणांसाठी ट्राय करा महेश्वरी साडीचे ७ सुंदर आणि रॉयल डिझाइन्स!

पुण्यात पर्वतीवर कार्तिक स्वामी उत्सवास प्रारंभ; दर्शनाची नेमकी वेळ कोणती? मोरपिसे वाहण्यास बंदी का? जाणून घ्या सर्व माहिती

तुमचाही फोन टॅप होतोय? दुर्लक्ष करू नका! या 5 संकेतांमधून लगेच ओळखा

Maharashtra News Live Update: ‘धंगेकरांना अल्झायमर झाला आहे, त्यांच्या लक्षात राहत नाही’; पुष्कर तुळजापूरकरांची टीका

Shocking : खासदार अशोक चव्हाणांच्या शोरूममध्ये चोरी, नांदेडमध्ये धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT