धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं; या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलना दरम्यान २१ नोव्हेंबरला (Jalna) जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी ३६ आयोजकासह अडीच हजार जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मराठा समाजानंतर धनगर समाजाच्यावतीने (Dhangar Reservation) राज्यभरात आंदोलन उभारण्यात आले आहे. या दरम्यान जालना येथे धनगर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. मात्र या आंदोलनादरम्यान मोर्चाला हिंंसक वळण आले होते. तर आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परिसरातील दुचाकींसह उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली. दगडफेक करत तोडफोड करण्यात आली होती. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, यावेळी (Police) पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरवात केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जालना तालुका पोलिस ठाण्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकारणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी दहा आयोजकांना अटक केल्याची माहिती दिली आहे. मात्र ही माहिती खोटी असल्याचे आयोजकाचं म्हणणं असून आम्ही स्वतःहा स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि पोलिस ठाण्यात हजर झालो. मात्र विभागीय पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे खोटी माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप आयोजकांनी करत आमच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या OBC समाजातील कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप केला. काल घडलेल्या संपूर्ण घटनेला संपूर्णपणे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे ही आयोजकांचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.