Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : वेट अँड वॉच आहे, ५ तारखेनंतर खरा लढा सुरू होईल; भास्कर दानवे यांनी दिले मैत्री पूर्ण लढतीचे संकेत

Jalna News : भास्कर दानवे यांनी एक अपक्ष तर दुसरा उमेदवारी अर्ज भाजपकडून भरला आहे. भास्कर दानवे जालना विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: राजकारणात काहीही होऊ शकतं. आम्ही महायुतीकडून आशावादी आहोत की आम्हाला एबी फॉर्म मिळाला पाहिजे. एबी फॉर्म मिळाला नाही तरी उमेदवारी निश्चित राहील. यामुळे सध्या वेट अँड वॉच असून ५ तारखेनंतर खरा लढा सुरु होईल; अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली. 

भास्कर दानवे यांनी एक अपक्ष तर दुसरा उमेदवारी अर्ज भाजपकडून भरला आहे. भास्कर दानवे जालना (Jalna) विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र महायुतीने जालना विधानसभेची उमेदवारी अर्जुन खोतकर यांना जाहीर केली. त्यामुळे भास्कर दानवे समर्थक नाराज दिसत असून भास्कर दानवे बंडखोरीच्या (BJP) तयारीत आहेत. यामुळे जालना विधानसभा निवडणुकीत कशी लढत होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे. मात्र ५ तारखेनंतर खरा लढा सुरू होईल; असं सांगत भास्कर दानवे म्हणालेत कि एबी फॉर्म आला तर जालन्यात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे संकेत भास्कर दानवे यांनी दिले. राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असून जालना काही वेगळा नाही. या ठिकाणी देखील मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor : 'वो मत डालना...' चुलत भावाच्या रोक्याला पोझ देताना करिश्मा कपूरचा पाय घसरला अन् पडता पडता वाचली, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

Tejaswini Pandit: महाराष्ट्र हरलास तू ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाली...

Dharmarao Baba Atram: शरद पवारांचं राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान

Belapur : संदीप नाईकांचा 377 मतांनी निसटता पराभव, अपक्ष संदीप नाईकांना 513 मते, तुतारीसारख्या ट्रम्पेटलाही भरघोस मते

SCROLL FOR NEXT