Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: घरपोच पोहचवीत होता दारू; महिलांचा राग अनावर अन्‌.., सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

घरपोच पोहचवीत होता दारू; महिलांचा राग अनावर अन्‌.., सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

लक्ष्मण सोळुंके

जालना : गावात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या दारू विक्रेत्याला महिलांनी बेदम चोफ दिला. ही घटना अंबड तालुक्यातील बारसवाडा गावात घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे. (Tajya Batmya)

बंडु शिंदे असे अवैध दारू विक्रेत्यांचे नाव असून तो गेल्या अनेक दिवसांपासून गावात अवैधरित्या दारू व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली. महिला घरी नसताना त्यांच्या पतीला ही तो अवैधरित्या दारू घरपोच पोहचवीत होता. यामुळे महिलांना राग अनावर झाल्याने महिलांनी त्याला रंगे हात पकडून बेदम चोप देत कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. त्याला गोंदी पोलिसांच्या स्वाधीन करत त्यांच्या विरुद्ध अवैध दारू विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांविरूद्धही तक्रार दाखल

दारू विक्रेत्यास मारहाण केल्या प्रकरणी दारू विक्रेत्यांनी ही महिलांविरुद्ध तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली. अवैध दारू विक्रेत्यांस गावातील रणरागिणी महिलांनी रौद्र रूप धारण करून जोरदार चोप देवून पोलीसांच्या स्वाधीन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ही व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रुपसिंग नाईक यांचे निधन...

Skincare Tips : ५ मिनिटांत चमकदार त्वचा हवीय? स्टेप बाय स्टेप फॉलो करा 'हे' स्किन केअर रूटीन

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्ट प्रवाशांसाठी सुरु! पहिलं विमान दाखल | VIDEO

Shocking : वंशाला दिवाच हवा म्हणून गर्भपात केला, पण महिलेचा जीव गेला, सोलापूरमधील धक्कादायक घटना

Gold Price Today : आजपण सोनं महागलं, ख्रिसमसला प्रति तोळा इतका दर वाढला, पाहा ताजे रेट्स

SCROLL FOR NEXT