Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: कृषीमंत्री मुंडे, पालकमंत्री सावे हरवले, सापडल्यास संपर्क साधा; जालन्यात शेतकऱ्यांनीच लावले बॅनर

कृषीमंत्री मुंडे, पालकमंत्री सावे हरवले, सापडल्यास संपर्क साधा; जालन्यात शेतकऱ्यांनीच लावले बॅनर

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस नाही. अशात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असतांना कृषिमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) व पालकमंत्री अतुल सावे हे (Jalna News) जिल्ह्यात फिरकले नाही. यामुळे राज्याचे कृषिमंत्री मुंडे व पालकमंत्री अतुल सावे हे हरवले असल्याचे बॅनर जालन्याय झळकले आहे. (Breaking Marathi News)

जालना जिल्ह्यात मागील अडीच महिन्यापासून पावसाचा थेंबही पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या पिकांची वाळलेली काडी झाली आहे. मात्र (Farmer) शेतकऱ्यांचा कोणी विचार करत नसून राज्यात राजकीय मंडळी राजकीय पोळी भाजण्यात व्यस्त आहे. दुष्काळी परिस्थिती झाली असताना शासनाकडून कोणताही निर्णय किंवा घोषणा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेली नाही. आर्थिक संकटात असलेला शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून कृषीमंत्र्यांसह जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांदाकडे पाठ फिरवली आहे.

शेतकऱ्यांनीच लावले बॅनर 

कृषी मंत्री आणि पालक मंत्री कुठं आहे? असा प्रश्न निर्माण झाल्याने भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे आणि बरंजळा साबळे गावातील शेतकऱ्यांनी जालना- जळगाव महामार्गांवरील फाट्यावर चक्क कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पालकमंत्री अतुल सावे हरवल्याचे बॅनर लावले आहे. इतकेच नाही तर बॅनर लावून दोन्ही मंत्री कुणाला सापडल्यास मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा; त्या मंत्र्याना पावसाअभावी सुकलेल्या पिकांचा पालापाचोळा भेट देणे आहे अशा आशयाचा बॅनर लावला आहे. हे बॅनर लक्ष वेधत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

Accident : आयटीआयसमोर भीषण अपघात, स्पीड ब्रेकरवर वाहन आदळलं अन् दोन तरुणांचा मृत्यू

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT