Beed News
Beed NewsSaam tv

Beed News: अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; अंबाजोगाईत महाविकास आघाडीचा जनअक्रोश मोर्चा

Beed News : अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; अंबाजोगाईत महाविकास आघाडीचा जनअक्रोश मोर्चा
Published on

बीड : पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परंतु शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही. या विरोधात (Beed) बीडच्या अंबेजोगाईत महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) जणआक्रोश मोर्चा काढत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर, करा अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. (Maharashtra News)

Beed News
Agriculture News : पाऊस नसल्याने सोयाबीन, मूंग गेला वाया; शेतकऱ्यांनी फिरविला नांगर

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महाविकास आघाडीकडून जणआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा मुख्य मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात बैलगाडी देखील होती. या मोर्च्याच्या माध्यमातून दुष्काळ जाहिर करून शेतकर्‍यांना सरसकट १ लाख रूपये मदत करावी. १०० टक्के पिक विमा मंजुर करावा. २५ टक्के पीकविमा अग्रीम देण्यात (Ambajogai) यावे. विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क व शेतकर्‍यांचे वीज बील माफ करावे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरांना चारा व जनतेला मोफत स्वस्त धान्य उपलब्ध करावे.  एम.आर.ई.जी.एस.(रोहयो) अंतर्गत कामे सुरू करण्यात यावीत. यासह विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश करण्यात आला.

Beed News
Baramati News : पावसाने फिरवली पाठ; पेरूच्या उत्पादनावरही परिणाम

तर कृषिमंत्री पदाचा राजीनामा द्या 

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पायी ठेवून दिला जाणार नाही असा संतप्त इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. तसेच मोर्चात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत कृषिमंत्री पदाची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी देखील करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com