Aditya Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray: आदित्‍य ठाकरेंनी दिले राज्‍य सरकारला आव्‍हान; म्‍हणाले चर्चेसाठी वर्षावरही यायला तयार

आदित्‍य ठाकरेंनी दिले राज्‍य सरकारला आव्‍हान; म्‍हणाले चर्चेसाठी वर्षावरही यायला तयार

लक्ष्मण सोळुंके

जालना : आपल्या राज्यातून बाहेर उद्योग चालले कसे? यावर जनतेसमोर चर्चा करू. ही चर्चा जिथे तुम्ही (Jalna News) करायला तयार आहात तिथे मी येईन. वेळप्रसंगी वर्षावरही चर्चेसाठी बोलावलं तरीही यायला तयार असल्याचे आव्हान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारला दिले आहे. (Breaking Marathi News)

शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे हे जालन्यातील सोमठाणा येथे आले होते. यावेळी आयोजित सभेत त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिले आहे. महाराष्ट्राचे ५ तुकडे करायचे आहे; असं सांगत हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरते अशी कोपरखळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला लगावली.

महाराष्ट्राला धोके देणारे सरकार

स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असं हे सरकार आहे. मात्र कुणाचा शो फ्लॉप झाला; याचा मी आनंद साजरा करत नाही असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री हे नाव न घेता ठाकरे कुटुंबावर टीका करत असून ते ठाकरे परिवाराला संपवायला निघाले. हे त्यांनी सांगून दाखवावं असं आव्हान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT