Samruddhi Mahamarg Accident Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पिकअपची ट्रकला मागून धडक, अपघातात एक ठार

Pickup - Truck Accident On Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पिकअपची ट्रकला मागून धडक, अपघातात एक ठार

लक्ष्मण सोळुंके

जालना : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र अजूनही थांबत नाही. या महामार्गावर रोज अपघात होत आहेत. यात महामार्गावर उभ्या असलेल्या कारला वाचवताना बोलेरो पिकअप गाडी ट्रकवर मागून जाऊन आदळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्‍यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी आहे. (Live Marathi News)

समृद्धी महामार्गावरील दुधणवाडी गावाजवळ चॅनल क्रमांक ३८८/२०० ट्रकचा कठडा तुटल्याने कार ८० किलोमीटर लेनवर उभी होती. या कारला वाचवताना मागून भरधाव वेगाने येणारी बोलेरो पिकअपने समोर जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पिकअप बोलेरो चालक मोहोम्मद शाहरुख हा गंभीर जखमी झाला आहे. तर त्याचा सहकारी अब्दुल कादिर मोहम्मद खलील शेख जागीच ठार झाला आहे. चालकाला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पिकअपची कॅबिनचा चुराडा

हा अपघात इतका भीषण होता की अक्षरश बोलेरो पिकअपचा चेदामेंदा झाल्याने पोलिसांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या साह्याने महिंद्रा बोलेरोची बॉडी ओढून काढावी लागली आहे. या अपघातानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाला हायड्राच्या मदतीने अ‍ॅडमिन बिल्डिंगमध्ये हलवत समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT