Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : जालना जिल्ह्यातील ४० लाडक्या बहिणींनी नाकारला लाभ; ५ लाखांहून अधिक लाभार्थी

Majhi Ladki Bahin Yojana Scheme: विधानसभा निवडणुकीनंतर सदरच्या योजनेसाठी निकष लावत योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांची पुन्हा छाननी करून अर्ज रद्द केले जात आहेत. यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: राज्य शासनाने महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र यासाठी पुन्हा निकष लावण्यात आल्याने अनेकांचे अर्ज बाद होत आहेत. तर काही महिला स्वतःहून योजनेचा लाभ नाकारत आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ४० लाडक्या बहिणींनी आता लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला आहे. दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी सुरूच आहे. 

राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. यात सुरवातीला अर्ज करणाऱ्या सर्व महिलांना पात्र ठरवत सरसकट १५०० रुपयांचा लाभ दिला जात होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सदरच्या योजनेसाठी निकष लावत योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांची पुन्हा छाननी करून निकषात ना बसणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द केले जात आहेत. यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे. 

४० महिलांनी नाकारला लाभ 

जालना जिल्ह्यात ५ लाखांपेक्षा जास्त महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत. योजनेसाठी पात्र नसताना योजनेकरीता चुकून अर्ज केलेल्या जवळपास ४० महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको; म्हणून जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ४० महिलांचा लाभ बंद केला असल्याची माहिती जालना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी दिली.

प्रशासनाकडून आवाहन 

दरम्यान, सदर योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी अद्याप सुरूच आहे. यात निकषात न बसणार्यांचे अर्ज बाद केले जाणत आहे. तर पात्र नसताना ही ज्या महिलांकडून योजनेसाठी चुकून अर्ज केला गेला असेल त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून मिळणारा लाभ थांबवावा असं अवाहन कोमल कोरे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT