Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : जालना जिल्ह्यात १३ तडीपार, ८८९ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई

Jalna News : जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापले आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस दल ॲक्शन मोडवर आले आहे. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून विविध गुन्ह्यातील १३ आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. 

जालना (Jalna) जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या आखाड्यात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावं, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी; यासाठी पोलिसांकडून  प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी (Jalna Police) पोलिसांकडून नाकाबंदी करत कारवाई कडक बंदोबस्त करण्यात येत आहे. 

जालना जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यात पोलिसांनी १३ आरोपीना तडीपार करण्याची कारवाई केली आहे. तर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत विविध गुन्ह्यांत आरोपी असणाऱ्या ८८९ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT