Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: एका वर्षापूर्वीच झालं होतं लग्न; विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, परिसरात खळबळ

गर्भपात करून घे असा दबाव टाकून हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याने या मानसिक त्रासातून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Crime News: जालन्यातून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. गर्भपात करून घे असा दबाव टाकून हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याने या मानसिक त्रासातून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जालना शहरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

प्रतीक्षा पवार असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे. प्रतीक्षाचं एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिने एका वर्षांपूर्वी प्राध्यापक असलेल्या परमेश्वर पवार याच्या सोबत विवाह केला होता. दरम्यान रात्री प्रतीक्षा हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. या घटनेने प्रतीक्षा राहत असलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर प्रतीक्षा हिच्या वडिलांनी तालुका पोलीस ठाण्यात आरोप केला की, 'प्राध्यापक परमेश्वर पवार आणि त्यांच्या कुटुंबाकडून प्रतीक्षाला गेल्या काही महिन्यांपासून हुंडासाठी त्रास दिल्या जात होता'. तिला दिवस गेल्याने तिला गर्भपात करण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकला जात असल्याने प्रतीक्षाने या मानसिक त्रासातून आत्महत्या केल्याची तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी प्राध्यापक परमेश्वर पवार याच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

समलिंगी मित्राच्या पत्नीसोबतच्या अनैतिक संंबधांतून बँक अधिकाऱ्याचा खून

जालन्यातील मंठा बाजार समितीच्या आवारात ४० वर्षाच्या प्रदीप कायंदे या तरुणाचा ८ एप्रिलला मृतदेह आढळून आला होता. एका एजन्सीमार्फत बँक वसुली अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कायंदे यांचा खून झाला असल्याचे वैद्यकीय अहवालावरून निष्पन्न झाले होते.

या खुनाच्या तपासामध्ये अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली असून 'बोल्ड गे' अँपवरून जुळलेल्या समलिंगी संबंधांतून हा खून झाला असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी होमगार्डसह मुख्य आरोपीला अटक केली असून पोलीस आणखी ईतर आरोपींच्या शोधात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rose Water Bath Benefits: गुलाबपाण्याने आंघोळ केल्याने शरीराला होतात 5 आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल आतून स्वच्छ

Maharashtra News Live Update: शरद पवार आज दुष्काळी तालुक्याचा दौरा करणार, पुरंदरमधील शेतकऱ्यांना भेटणार

Today Horoscope : टेन्शन नॉट! अचानक होईल धनलाभ, 'या' ५ राशींचे नशीब उजळणार; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

Diabetics : डायबिटिसचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का?

Maharashtra Rain: राज्यात ऊन-पावसाचा खेळ! परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, ७ जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT