Jalna : माजी सरपंचाची झोपेतच गोळ्या झाडून हत्या! SaamTvnews
महाराष्ट्र

Jalna : माजी सरपंचाची झोपेतच गोळ्या झाडून हत्या!

आज सकाळी राठोड यांच्या घरातील मंडळींना त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना (Jalna) जिल्ह्यातील मोहाडी (Mohadi) येथील माजी सरपंचाची झोपेत असतानाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. छबु राठोड असं हत्या झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. राठोड हे रात्री त्यांच्या घराच्या अंगणातच खाटेवर झोपलेले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा त्यांच्या मारेकऱ्यांनी उठवला.

(Jalna Mohadi Murder Of Former Sarpanch)

हे देखील पहा :

रात्रीच त्यांची हत्या (Murder) करण्यात आली होती. आज सकाळी राठोड यांच्या घरातील मंडळींना त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पोलीस (Police) चौकशी सुरु करत तपासाला वेग दिला आणि राठोड यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अजयसिंग राठोड, रामनाथ राठोड, विद्या राठोड, योगेश राठोड आणि आणखी एक अज्ञात आरोपी अशी संशयित आरोपींची नावं आहेत. हत्या झालेले छबु राठोड आणि आरोपींमध्ये याआधी देखील मारहाण होऊन एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. शिवाय बऱ्याच वेळा वाद देखील झाले होते. अखेरीस पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT