JALNA CHILD ABUSE CASE: STEPFATHER ARRESTED AFTER BRUTAL ASSAULT ON MINOR BOY, VIRAL VIDEO SPARKS OUTRAGE Saam Tv
महाराष्ट्र

Jalna : माणुसकीला काळिमा! निर्दयी बापाने पोटच्या पोराला हातपाय बांधून बेदम मारले; मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Jalna News : जालना जिल्ह्यात सावत्र बापाने चिमुकल्या मुलाला हातपाय बांधून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

Alisha Khedekar

  • जालन्यात सावत्र बापाने मुलाला अमानुष मारहाण केली

  • मारहाणीचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला

  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

  • मुलाची सुखरूप सुटका

अक्षय पाटील, जालना

जालना जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पैशांसाठी एका चिमुकल्या मुलाला हातपाय बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून चिमुकल्याचा सावत्र बाप असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलाची सुखरूप सुटका केली आहे. शेख अनिस शेख वजीर असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख अनिस शेख वजीरने आपल्या सावत्र मुलाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच या माध्यमातून पैशांची मागणी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये चिमुकल्याला हातपाय बांधून मारहाण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जालना पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान संबंधित मुलगा आरोपीच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलाची सुखरूप सुटका केली. सध्या या मुलाला त्याच्या कुटुंबाकडे देण्यात आले असून तो सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी चिमुकल्याच्या आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी शेख अनिस शेख वजीर याला शिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार मारहाणीची घटना शिर्डी परिसरात घडल्याचे समोर आल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी शिर्डी येथे वर्ग करण्यात येणार असल्याचे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी सांगितले. या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT