Jalna Antarwali Sarati News:  Saam tv
महाराष्ट्र

Jalna Antarwali Sarati News: अंतरवाली दगडफेक प्रकरणी मोठी कारवाई; प्रमुख आरोपी अटकेत

Antarwali Sarati News: अंतरवाली दगडफेक प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज झाल्यानंतर हिंसा आणि जाळपोळ प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Latest News:

जालन्यातील अंतरवाली दगडफेक प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज झाल्यानंतर हिंसा आणि जाळपोळ प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाल्यानंतर हिंसा आणि जाळपोळ प्रकरणी अंबड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंबड पोलिसांनी ४ जणांना बीड जिल्ह्यातील गेवराईमधून ४ जणांना ताब्यात घेतलं.

प्रमुख आरोपी सराईत गुन्हेगार

पोलिसांनी ऋषीकेश बेद्रे (43),निलेश राठोड,(42) ,शनिदेव शिरसठ( 22) कैलास सुरवसे (41 ) यांना ताब्यात घेतलं आहे. अंतरवाली सराटी येथील जाळपोळ प्रकरणात ताब्यात असलेल्या चारही जणांचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेद्रे यांच्याकडे गावठी पिस्तूलासह 2 जिवंत काडतुसे सापडली आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले चारही जण सराईत गुन्हेगार असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर यापूर्वी ही गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

बीडमध्ये ४ आरोपींना घेतलं ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील आरोपी बीड जिल्ह्यात काळ्या रंगाच्या चारचाकीतून फिरताना आढळले. त्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई येथून पोलिसांनी या चारही जणांना ताब्यात घेतले.

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना त्यांच्याजवळ एक पिस्तूल (गावठी कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसे सापडले आहेत.

या सर्व आरोपींवर सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात इतर आरोपींचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे. तसेच प्रमुख आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT