Buldhana Tractor Accident Saam Tv
महाराष्ट्र

भयंकर! शेतीची मशागत सुरू असताना ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

या घटनेत मुरकुटे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने विहिरीमध्येच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

लक्ष्मण सोळुंके

जालना : सध्या पेरणीचा हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांची (Farmer) कामाची लगबग सुरू आहे. अशातच शेतात मशागतीचे काम सुरु असताना शेतकऱ्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर (Tractor Accident) थेट कोसळला. या घटनेत ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील बोरगाव जहागीर शिवारात घडली. (jalna Bhokardan Tractor Accident)

संदीप अशोक मुरकुटे (रा. बोरगाव जहागीर, ता. भोकरदन. जिल्हा जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (5 मे) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मुरकुटे हे बोरगाव जहागीर शिवारात ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीचे काम करत होते. त्यावेळी अचानक त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला.

या घटनेत मुरकुटे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने विहिरीमध्येच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, विहिरीत कोसळ्याने ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. मुरकुटे यांचा मृतदेह रात्री उशीरापर्यंत बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, नागरिकांनी विहिरीत पडलेला ट्रॅक्टर सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र, सायंकाळ होत असल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. सोमवारी सकाळी अपघातग्रस्त ट्रॅक्टर विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. अशोक मुरकुटे यांच्या निधनाची वार्ता कळताच बोरगाव जहागीर, आणि केदारखेडा परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rainfall Alert : सतर्क राहा! पुढचे ७ दिवस धो-धो कोसळणार, IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

हाडं ठिसूळ झाली? उठता बसता कटकट आवाज येतो? ५ रूपयांचा 'हा' पदार्थ खा, स्ट्राँग हाडांचं सिक्रेट

Skin: जास्त वेळ पाण्यात राहिल्यानंतर त्वचा आकुंचन का पावते?

Maharashtra Live News Update : हुंडा घेणारे नामर्द, अभिनेते मकरंद अनासपुरेंचं परखड मत

Explainer: गुंतवणूकदारांची वाढली धकधक; चीनवर 100 टक्के टॅरिफ, अमेरिकेच्या निर्णयानं भारतावर काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT