कर्तव्य बजावताना सर्पदंश; पालघरच्या जवानाचे पठाणकोटमध्ये निधन

पठाणकोटच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
Jawan Mahesh padvale
Jawan Mahesh padvaleSaam Tv
Published On

पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यातील विक्रमगड (Vikramgad) तालुक्यातील कऱ्हे गावचे सुपुत्र महेश रामा पडवले या जवानाला वीरमरण आले. पंजाब प्रांतातील पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱ्या महेश रामा पडवले यांना वीरमरण आले. महेश रामा पडवले यांचं पार्थिव रात्री मुंबईत आल्यानंतर आज त्यांच्यावर कऱ्हे या मूळगावी या शासकीय इतनामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Palghar Vikramgad Latest News)

Jawan Mahesh padvale
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यातील शाळा पुन्हा बंद होणार?, वर्षा गायकवाड म्हणाल्या....

5 जून रोजी बीएसएफचे बीएन मुख्यालय 58 माधोपूर येथे कर्तव्य बजावत असताना जवान महेश पडवळे यांच्या डाव्या हाताला साप चावला होता. त्यानंतर तत्काळ महेश पडवळे यांना पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महेश फडवळे यांच्या पत्नी श्रीमती परमिला पडवळे यांनी या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

पठाणकोटच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. पठाणकोटमधील बीएसएफचे BN मुख्यालय 58 माधोपूर जवळ थारियाल गावात महेश रामा फडवले हे 2019 पासून भाड्याच्या घरी राहत होते. त्यांच्या पश्चात वडील रामा फडवळे, आई रख्मी फडवळे, पत्नी परमिला फडवळे आणि मुलगी नॅन्सी फडवळे असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com