Jalna Crime लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या; आपसात झालेल्या भांडणातून घडली घटना

जालना रोडवरील सोयगाव देवी फाट्यावर ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले

लक्ष्मण सोळुंके

जालना: जालन्यातील (Jalna) भोकरदनमध्ये गेल्या २ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २३ वर्षाच्या ट्रक चालकाची दगडाने डोकं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना काल सकाळी भोकरदन- जालना रोडवरील सोयगाव देवी फाट्यावर ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. भगवान तळेकर असे हत्या (killing) करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असल्याचे सामोर आले होते .गेल्या २ दिवसांपासून भगवान बेपत्ता होता. अज्ञात मारेकऱ्यांनी अगोदर दगडाने (stones) डोकं ठेचुन ही हत्या केल्याचं तपासादरम्यान समोर आले होते.

हे देखील पहा-

हत्या केल्यानंतर त्याचा मृत्यदेह वाळलेल्या कपाशीच्या पऱ्हाटयामध्ये जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याच समोर आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या हत्येप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी (Accused) विरोधात हत्येचा गुन्हा दाखल तपास सुरू केला असता भगवान तळेकर ज्या ट्रान्सपोर्ट काम करत होता. त्याठिकाणी तपास केला असता भगवान यांचा मंगेश दळवी हा मित्र असल्याची माहिती समोर आली.

मंगेश याला पोलिसांनी भगवान विषयी विचारणा केली असता तो उडवा उडावीचे उत्तर देत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. चौकशीमध्ये आपणच भगवान तळेकर यांची किरकोळ भांडण्याच्या कारणावरून दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली मंगेश दळवी या आरोपीने देत कुणाला काही कळू नाही म्हणून त्यांचा मृत्यूदेह कपाशीच्या पऱ्हाटयामध्ये जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची कबुली ही त्यांनी दिली आहे. नंतर पोलिसानी मंगेश दळवी याच्याविरुद्ध गुन्हाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसानी तपासाचे चक्र जलद गतीने फिरवत आरोपीला ५ तासामध्ये बेड्या ठोकले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

SCROLL FOR NEXT