Jalna Latest News Update 
महाराष्ट्र

Jalna : शेतकऱ्यांच्या नावाने सरकारी अधिकाऱ्यांनी पैसे लाटले, जालन्यात 50 कोटींचा घोटाळा

Jalna Latest News Update : जालन्यात शेतकर्‍यांचे अतिवृष्टी आणि गारपिटीचे 50 कोटी अनुदान तलाठी आणि ग्रामसेवकांनी लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांची चौकशी सुरू, अजूनही अनेक गावांची तपासणी बाकी आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Jalna farmer scam News : जालन्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि गारपीटीचे (Crop relief fraud Maharashtra) तब्बल 50 कोटी रुपये अनुदान तलाठी आणि ग्रामसेवकांनी हडप केल्याचं समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून हा तलाठ्यांनी आणि ग्रामसेवकांनी हा घोटाळा केला आहे. एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे VK नंबर बनवून घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

2023 मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं होतं. त्या शेतकऱ्यांना शासनाकडून सहानुग्रह अनुदान देखील मंजूर करण्यात आलं. मात्र या अनुदानापैकी तब्बल 50 कोटी रुपये काही तलाठी , ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी हडप केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

दरम्यान या घोटाळ्याची प्रशासनाकडून सध्या गुप्त चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या घोटाळ्यात किती तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांचा सहभाग आहे, ते समोर येणार आहे. दरम्यान आतापर्यंत जालन्यातील अंबड आणि घनसावंगीतील 80 गावाची तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील इतरही गावाची तपासणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अतिवृष्टी घोटाळा सूक्ष्म नियोजितपणे झाला असून हा घोटाळा 50 कोटींचा नसून 100 कोटींचा असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. दरम्यान अतिवृष्टी घोटाळा झाल्याच जालन्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी कबूल केलं असले तरी नेमकी किती रुपयांचा घोटाळा झाला हे चौकशीनंचरच पुढे येणार आहे.

घोटाळ्याविषयी बोलताना उपजिल्हाधिकारी काय म्हणाले?

पिक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये काही गोष्टी लक्षात आल्या होत्या, काही ठिकाणी डुबलीकेशन झालेल आहे काही ठिकाणी बोगस याद्या जोडून अनुदान उचललेले आहे.या तक्रारीनंतर जानेवारीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठित केली आहे. घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या दोन तालुक्यातील 75 ते 80 गावांमध्ये तलाठी ने अपलोड केलेले ज्या याद्या होत्या त्याची प्राथमिक तपासणी चौकशी समिती करत आहे. यामध्ये तलाठी,मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांना चौकशीसाठी बोलवलं आहे.

चौकशी समितीमध्ये तीन अधिकाऱ्यांचा समावेश..

1) पुलकित सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबड

2) मनीषा दांडगे, उपजिल्हाधिकारी रोहयो जिल्हाधिकारी कार्यालय जालना

3) नीलम लुनावत , नायब तहसीलदार रोहयो जिल्हाधिकारी कार्यालय जालना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, कसा असेल दौरा? VIDEO

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT