Jalna Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Cyber Crime: ऑनलाईन फसवणुकीतून गेलेली ५३ हजाराची रक्‍कम परत; सायबर पोलिसांच्‍या पाठपुराव्‍याने यश

ऑनलाईन फसवणुकीतून गेलेली ५३ हजाराची रक्‍कम परत; सायबर पोलिसांच्‍या पाठपुराव्‍याने यश

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरातील इसमाची ५३ हजारात ऑनलाईन फसवणुक झाली होती. याबाबत सायबर पोलिसांनी (Cyber Police) दाखल तक्रारीवरून पोलिसांनी २४ तासात संबंधीत तक्रारदाराच्‍या (Jalna News) खात्‍यात ५३ हजार ६७८ रुपये इतकी रक्‍कम परत मिळवून दिली आहे. (Breaking Marathi News)

जालना शहरातील अमितकुमार गणेशराव लोखंडे यांना ऑनलाईन फसवणूक करणारा फेक फोनकॉल आला. त्यांनी आयसीआयसीआय (Bank) बँकेचे क्रेडिट कार्डची लिमिट वाढून देत सांगत मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला. या ओटीपीच्या आधारे लोखंडे यांच्या क्रेडिट कार्डमधून ५३ हजार ६७८ रुपये आपल्‍या खात्यात वळविले. लोखंडे यांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) केली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लोखंडे यांनी तात्काळ सायबर पोलिसांची संपर्क करून लेखी तक्रार दाखल केली होती.

सायबर पोलिसांचा पाठपुरावा

सायबर पोलिसांनी माहितीच्या आधारे पोर्टल कोणाचे याची माहिती प्राप्त करून लोखंडे यांच्या खात्यातून वळवलेली रक्कम ज्या वॅलेटमध्ये जमा झाली. त्या कंपनीच्या बॅलेटच्या नोडल अधिकाऱ्याला तात्काळ मेल पाठवत सदर रक्कम परत करणेबाबत कळविले. तसेच संबंधीत वॅलेटला पाठपुरावा करुन तक्रारदार यांचे फसवणुकीद्वारे वळविलेली रक्कम तक्रारदार लोखंडे यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती वॅलेट नोडल अधिकारी यांनी पोलिसांना दिली आहे. सायबर पोलिसांच्या या तात्परतेमुळे पैसे परत मिळाल्यामुळे तक्रारदार लोखंडे यांनी समाधान व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

SCROLL FOR NEXT