Jalna Rape Case News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : संतापजनक! शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीकडे प्रायव्हेट फोटो मागितले; ब्लॅकमेल करत बलात्कार केला

Jalna Crime News : जालन्यातील एका खासगी शाळेतील शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीचे प्रायव्हेट फोटो मागून तिला ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • जालन्यातील एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार

  • शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीचे प्रायव्हेट फोटो मागून तिला ब्लॅकमेल केलं

  • विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

  • आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली

अक्षय शिंदे, जालना

Jalna 14 Years Girl Student Rape By Teacher आई वडिलांसारखेच शिक्षक देखील मुलांच्या भविष्याची जडणघडण करत असतात. मात्र या शिक्षकी पेशातील एका राक्षसाचा क्रूर चेहरा जालन्यातील एका घटनेतून समोर आला आहे. एका खासगी शाळेच्या शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीवर दबाव टाकत तिच्याकडून प्रायव्हेट फोटोंची मागणी केली. इतकेच नाही तर, या शिक्षकाने त्याच फोटोंचा वापर करून विद्यार्थीनीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर मुली विद्येच्या मंदिरात देखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील एका नामंकित खासगी शाळेतील शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीला शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याकडे तिचे प्रायव्हेट फोटो मागितले. सुरुवातीला विद्यार्थिनीने या मागणीला विरोध केला. मात्र आरोपीने तिच्यावर दबाव टाकून तिचे प्राव्हेट फोटो मिळवले. या फोटोंच्या आधारे आरोपी विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या फोटोंच्या आधारे आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केले. हा शिक्षक एक वर्षापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून या विद्यार्थिनीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. दरम्यान पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून घडलेल्या घटनेबाबत कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबीयांनी तातडीने कदीम जालना पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांमध्ये पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संबंधित संशयित आरोपी शिक्षक विक्की शिंदे याला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास कदीम जालना पोलीस (Jalna Kadim Police) करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शाळेसारख्या ठिकाणी देखील मुली सुरक्षित नाहीत हे आढळून आलं आहे. आता या शिक्षकावर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

High Court: आईपासून वेगळं हो, बायकोच्या हट्टाला नवऱ्याकडून नकार, शेवटी कोर्टानेच दिला मोठा निर्णय

Swara Bhasker: 'मी राणी पद्मावतीला भित्री म्हटलं नाही...'; त्या प्रकरणावरून ट्रोल झालेल्या स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक सामाजिक न्याय भवनावर चढले मराठा तरुण

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT