Jalna Crime News son-in-law physically assaulted the mother-in-law chandanzira area Saam TV
महाराष्ट्र

Jalna Crime News: बायको गावाला गेली, नराधम जावयाने सासूवर केला अत्याचार; जालन्यातील संतापजनक घटना

Son In Law Physically Assaulted Mother In Law: बायको गावाला गेली असताना घरात कुणी नसल्याची संधी साधत एका नराधमाने आपल्याच सासूवर अत्याचार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jalna Crime News: जालना जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बायको गावाला गेली असताना घरात कुणी नसल्याची संधी साधत एका नराधमाने आपल्याच सासूवर अत्याचार केला आहे. शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.  (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय आरोपी हा पत्नीसह शहरातील चंदनझिरा (Jalna News) परिसरात राहतो. त्याची ६५ वर्षीय सासू देखील त्यांच्याकडे राहत होती. आरोपी आणि त्याची पत्नी एका शेतकऱ्याकडे राखणदार म्हणून करतात.

बुधवारी रात्री सदर वृद्ध महिलेची लेक नातेवाईकांकडे गेली होती. त्यादिवशी मध्यरात्री जावई दारू पिऊन घरी आला आणि झोपेत असलेल्या सासूवर अत्याचार केला. वृद्धेने प्रतिकार केला असता, नराधम जावयाने तिला बेदम मारहाण देखील केली. (Breaking Marathi News)

या घटनेनंतर वृद्ध महिला प्रचंड घाबरली. तिने घडलेला प्रकार प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मुलीला सांगितला. पतीनेच आपल्या आईवर बलात्कार (Crime News) केल्याचं समजताच बायकोची पायाखालची जमीनच सरकली.

तिने तातडीने आईला घेऊन पोलिसांत (Police) धाव घेतली. दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर नराधम जावई फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. जावयानेच सासूवर अत्याचार केल्याचं उघड होताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT