Jalna Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime : दादागिरी वाढली; दुकानात घुसून व्यापाऱ्यावर हल्ला, पैसे मागत केले वार

Jalna News : जालना शहरातल्या कडबी मंडी या भागात सदरची घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास ४ अल्पवयीन मुले दुकानात घुसली. एकाच्या हातात कोयता होता. त्याने व्यापाऱ्याकडे पैसे देण्याची मागणी केली

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: दिवसाढवळ्या सर्रासपणे दादागिरी वाढली आहे. भर रस्त्यावर हल्ल्याच्या घटना घडत असताना लहान मुलांचा देखील यात सहभाग वाढत चालल्याचे पाहण्यास मिळत आहे. अशीच घटना जालना शहरात घडली असून अल्पवयीन मुलांनी दुकानात प्रवेश करत व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी करत थेट कोयत्याने वार करत जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

जालना शहरातल्या कडबी मंडी या भागात सदरची घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ४ अल्पवयीन मुले दुकानात घुसली. यामध्ये एकाच्या हातात कोयता होता. हत्यार सोबत ठेवत त्याने व्यापाऱ्याकडे पैसे देण्याची मागणी केली. मात्र यावेळी व्यापारी व दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. यातून त्या मुलाने व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. तीन वेळा वार करत त्याने या व्यापाऱ्याला जखमी केले. 

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

सदर घटनेत व्यापाऱ्याच्या पोटाला वार लागून ते जखमी झाले आहेत. कोयत्याने वार करत असताना आरोपीचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यामध्ये एकजण कोयत्याने वार करत असून व्यापाऱ्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो दुकानाबाहेर पडला. यानंतर काही लहान मुले दुकानात घुसून वस्तू फेकून मारत असल्याचे दिसून येत आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान घडल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून घटनेत व्यापारी जखमी झाला आहे. याप्रकरणी जालना शहरातल्या सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. यावरून हल्ला करणाऱ्यांचा शोध सदर बाजार पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT