Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: दारू पिण्यास मागितले पन्नास रुपये; नकार दिल्याने केला चाकूने वार

दारू पिण्यास मागितले पन्नास रुपये; नकार दिल्याने केला चाकूने वार

लक्ष्मण सोळुंके

जालना : दारू पिण्यास पन्नास रुपये न दिल्याने एकाने चाकूने छातीवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना (Badnapur) बदनापूर तालुक्यातील केळी गव्हान गावात घडली. यानंतर आरोपी (Jalna News) फरार झाला आहे. (Tajya Batmya)

केळी गव्हान (जालना) गावातील पप्‍पू भाऊसाहेब मदन हे आपल्या घरासमोर उभे होते. या दरम्‍यान गावातील भगवान शिवाजी मदन त्या ठिकाणी आला. त्याने काय चाललेय असं विचारत मला दारू पिण्यासाठी पन्नास रुपय दे असे म्हटले. त्यांनी पैशांसाठी तगादा लावत हुज्जत घालण्यास सुरवात केली. पैसे देण्यास नाकार देताच त्यांनी पपू मदन यांचा (Crime News) गळा धरून त्यांना ओढाताण करत खिशात हात घालून चाकू काढून छातीवर आणि हातावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले.

पपू मदन यांनी आरडाओरड करताच ग्रामस्थांनी धाव घेतली. या दरम्‍यान आरोपी भगवान मदन हा तेथून फरार झाला. यानंतर जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत जखमी पपू मदन यांच्या तक्रारीवरून भगवान शिवाजी मदन याच्या विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयन्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT