Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: रूम पार्टनर ठेवण पडलं महागात; पार्टनरने लावला ३ लाख ८२ हजाराचा चुना

रूम पार्टनर ठेवण पडलं महागात; पार्टनरने लावला ३ लाख ८२ हजाराचा चुना

लक्ष्मण सोळुंके

जालना : बदनापूर पंचायत समिती कार्यालयात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या योगेश बळीराम वटारे यांना रुम पार्टनर ठेवणे चांगलेच महागात पडले. रुममध्‍ये पार्टनर ठेवलेल्‍या व्‍यक्‍तीने त्यांना तब्बल तीन लाख 82 हजाराचा चुना लावला. या प्रकरणी (Badnapur) बदनापूर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

बदनापूर शहरातील आनंदनगर परिसरात सदर प्रकार घडला आहे. योगेश बळीराम वटारे हे बदनापूर पंचायत समितीत तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. मुख्यालय ठिकाणी कायम हजर राहता यावे, म्हणून त्यांनी शहरातील आनंदनगर परिसरात भाड्याने रुम करून राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यात त्यांची ओळख सदाशिव शंकरराव काळे (रा. येरंडेश्वर ता.पूर्णा जि.परभणी) या व्यक्तीशी झाली. या व्यक्तीने आपण पण बदनापूरला रुम शोधत असल्याचे सागितले. दोघांनी मिळून एक रुम घेतली.

चैन, अंगठी व रक्‍कम लांबविली

दोघे ही रुम पार्टनर म्हणून राहत असताना काळे यांनी कार्यक्रमाला जायचे म्‍हणून वटारे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठी व त्यांनी रुममध्ये ठवलेले नगदी 1 लाख 82 हजार 500 रुपये वेगवेगळ्या व्यक्तीच्या फोन पे नंबरवर फिर्यादीचा मोबाईलमधूम अशी एकूण 3 लाख 82 हजाराची फसवणूक करून पोबारा केला. वारंवार संपर्क करून ही संबंधीत रुम रुमपार्टनर फोन घेत नसल्याने रुमपार्टनरने आपल्याला 3 लाख 82 हजाराचा चुना लावल्याचे लक्षात आल्‍यावर बदनापूर पोलिस ठाण्यात सदाशिव शंकरराव काळे यांच्‍या विरूद्ध फसवणूक केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT