तुला मी पाहिजे का पैसे? म्हणत प्रेयसीने पाजले औषध! प्रियकराने उसने दिलते लाखो रुपये लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

तुला मी पाहिजे का पैसे? प्रेयसीने पाजले उंदीर मारायचे औषध! प्रियकराने उसने दिले होते लाखो रुपये

प्रेयसीला दिलेले लाखो रुपये प्रियकर परत मागत असल्यानं प्रेयसीनं प्रियकराला घरी बोलावून तुला मी पाहिजे का पैसे? असा जाब विचारत उंदीर मारण्याचे औषध टाकलेले पाणी पाजले!

लक्ष्मण सोळुंके

जालना : प्रेयसीला दिलेले लाखो रुपये प्रियकर परत मागत असल्यानं प्रेयसीनं प्रियकराला घरी बोलावून तुला मी पाहिजे का पैसे? असा जाब विचारत त्याच्या तोंडात बळजबरीने उंदीर मारण्याचे औषध टाकलेले पाणी पाजल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेतील प्रियकरावर सध्या शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

हे देखील पहा :

रमेश घुगे असं प्रियकराचं नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेयसीने देखील प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दिड वर्षांपासून रमेश घुगे याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. या संबंधांतूनच त्याने प्रेयसीला आतापर्यंत 5 लाख रुपये दिले आहे. मात्र प्रेयसीला आणखी पैसे हवे असल्याने त्याने तिला पैसे नाही म्हणून सांगितलं. शिवाय या आधी दिलेल्या 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर प्रेयसीनं प्रियकराला घरी बोलावून घेत तुला मी पाहिजे की पैसे असं विचारून त्याला पाणी पाजले.

हे पाणी पिल्यानंतर काही वेळाने प्रियकराला उलट्या झाल्याने प्रेयसीनं पिण्याच्या पाण्यातून उंदीर मारण्याचं औषध पाजल्याचं प्रियकराच्या लक्षात आलं. त्यानंतर प्रियकराला त्याच्या नातेवाईकांनी शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या प्रकरणी कदीम जालना पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून प्रियकर आणि प्रेयसी दोघांविरोधात देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर भीषण आग पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT