महाराष्ट्र

Jalna Crime: धक्कादायक! बोहल्यावर चढण्याआधीच भावी नवरदेवाने केली वधूची गळा चिरून हत्या

Jalna Crime: जालन्याच्या मंठा तालुक्यातील बेलोरा गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Crime: जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात भावी नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधीच वधूची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंठा तालुक्यातील बेलोरा गावात ही घटना घडली. दीप्ती उर्फ कल्पना असे हत्या झालेल्या आठरा वर्षीय तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीप्तीचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील तरुणासोबत ठरला होता. मार्चमध्ये 17 तारखेला विवाहचा मुहुर्त देखील ठरला होता. त्यामुळे दोन्हीकडचे मंडळी लग्नाचा बस्ता फाडण्यासाठी आज जालना शहरात आले होते. भावी नवरदेव देखील आपल्या परिवारासोबत जालन्यातत आला होता. (Latest Marathi News)

परंतु सगळे बस्ता बांधत असताना तो अचानक गायब झाला आणि त्याने थेट भावी वधूचे मंठा तालुक्यातील बेलोरा हे गाव गाठले. घरातील सगळेच लोक बस्ता बाधण्यासाठी जालन्याला गेलेले होते. त्यामुळे भावी वधू दीप्ती ही घरी एकटीच होती. यावेळी या तरुणाने तिची गळा चिरून हत्या केली. (Crime news)

या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हा तरुण फरार झाला होता. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती सेवली पोलिसांना दिली. त्यानंतर सेवली पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह विभागीय पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी तरूण सध्या फरार आहे. (Jalna News)

दरम्यान या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गावातील लोकांनी या तरुणाच्या आई-वडिलांना एका घरात कोंडून ठेवलं असून यांनी मुलीची भरपाई द्यावी आणि हुंडा म्हणून घेतलेले चार लाख रुपये परत करावे अशी मागणी केली आहे. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यास गावकरी विरोध करत असल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT