11th Standard Girl Assault Saam
महाराष्ट्र

नाशिक, अमरावतीनंतर आता जालन्यात अकरावीच्या मुलीवर अत्याचार; बुरखा घालून घरी न्यायचा अन्...

Jalna Crime News : नाशिक आणि अमरावती प्रकणानंतर आता जालन्यातूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालन्यामध्ये बिहारच्या अन्सारीने ११ वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

11th Standard Girl Assault : नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण आणि अमरावतीतील लैंगिक शोषणाच्या प्रकारामुळे राज्यात संतापाची लाट आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता जालन्यातही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकरावीत शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून साहिल अन्सारीने तिच्यावर बलात्कार केला. आत्महत्या करण्याची धमकी देत साहिलने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. बिहारच्या साहिल अन्सारीकडून महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना जालन्यात घडली आहे. आरोपी साहिल अन्सारीच्या विरोधात बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास केला जात आहे.

तरुणीची ओळख लपविण्यासाठी आरोपी तिला बुरखा घालून घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करत असे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जालना पोलिसांनी बिहारच्या साहिल अन्सारी नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याच्या विरोधात बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. साहिल अन्सारी हा मुलीची ओळख पटू नये म्हणून रस्त्यावरून येता-जाताना तिला बुरखा घालायला लावत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. शहरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुरुवारी एका संशयिताला अटक केली आहे. साहिल अन्सारी (रा. बिहार, सध्या मिल्लतनगर, जालना) असे संशयिताचे नाव आहे.

शहरातील अंबड चौफुली ते छत्रपती संभाजीनगर बायपास मार्गावरील एका महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर साहिल अन्सारी आणि पीडितेची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर साहिलने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पुढे संशयिताकडून सतत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी वाढत गेल्याने पीडितेने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दिली. या तक्रारीवरून साहिल अन्सारी याच्याविरुद्ध बलात्कार तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी साहिल अन्सारी याला गुरुवारी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Convoy Accident: विवाह समारंभातून परतताना आमदाराच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या

Maharashtra Monsoon Update: राज्यात आठ दिवस मुसळधार पाऊस; नदी नाल्यांना येणार पूर

Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Today Horoscope : वृश्चिक राशीसाठी तिप्पट लाभाचा महासंयोग, मकर-मीन राशीत प्रेमाचा वर्षाव; जाणून घ्या तुमचे भविष्य

ठाकरेसेनेचा पुन्हा पोपट मेला, ठाकरेसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT