Jalna Bus Accident 
महाराष्ट्र

Jalna Bus Accident : जालन्यात भीषण अपघात, दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

Jalna ST bus head-on collision today : जालना जिल्ह्यातील शहापूर परिसरात दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून शाळकरी विद्यार्थ्यांसह २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील | जालना प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Maharashtra school bus accident in Jalna : जालन्यातील अंबड-वडीगोद्री रस्त्यावरील शहापूर परिसरात दोन एसटी बसचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बसमधील शाळकरी विद्यार्थ्यांसह साधारण २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

विद्यार्थ्यांची बस अंबडकडे जात असताना अपघात

स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, 'मानव विकास मिशन'ची बस शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन भांबेरी येथून अंबडच्या दिशेने जात होती. याच दरम्यान शहापूर परिसरात समोरून येणाऱ्या दुसऱ्या बससोबत या बसची जोरदार धडक झाली. मानव विकासच्या बसमध्ये जवळपास २५ ते ३० विद्यार्थी होते, तर दुसऱ्या बसमध्ये १२ ते १५ प्रवासी प्रवास करत होते. या धडकेत दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले आहे.

जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना तातडीने अंबड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार सुरू असून गंभीर जखमींवर विशेष लक्ष दिले जात आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

प्राथमिक माहितीनुसार, (MH 14 BT 1750) क्रमांकाची 'मानव विकास मिशन'ची एसटी बस भांबेरी येथून शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे येत होती. तर दुसरी (MH 14 BT 3022) क्रमांकाची एसटी बस अंबडहून बीडकडे निघाली होती. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर या दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही बस चालकांसह काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, या भीषण अपघातामुळे जालना–वडीगोद्री महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणीच पाणी

Blood Pressure by Age: तुमच्या वयोमानानुसार तुमचा BP किती प्रमाणात असला पाहिजे?

पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

Masala Chai Recipe : 'मसाला चहा'ची सीक्रेट रेसिपी, एक घोट पिताच टपरीवरचा चहा विसरून जाल

Indian Railways: कॉल आणि एसएमएसने कॅन्सल होऊ शकतं ट्रेनचं तिकीट?

SCROLL FOR NEXT