Bhokardan Daughter in law kills mother in law  Saam Tv News
महाराष्ट्र

Jalna Crime : सासूला चाकूने पाचवेळा भोसकलं, एक तास घरात बसली, मृतदेहाला गोणीत टाकलं, अन्...; सासूच्या हत्येचा थरारक घटनाक्रम

Jalna Crime News : होत असलेल्या किरकोळ वादातून सासूची हत्या केल्याचं उघड झालंय. शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाच ते सहावेळा चाकूने वार करून सुनेने सासूला संपवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Prashant Patil

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातील्या सूनेने आपल्या सासूची हत्या केल्यानं जालन्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सूनेने शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाच ते सहावेळा चाकूने वार करून आपल्या सासूला संपवलं असून आरोपी सून आपल्या साथीदारासह फरार झाली. भोकरदन नाका परिसरामधील प्रियदर्शनी कॉलनी या परिसरामध्ये ही घटना घडली. कौटुंबिक कारणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. सविता शिंगारे असं मयत महिलेचे नाव आहे. आता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी सुनेला अटक केली आहे.

दरम्यान, सविता शिंगारे हिने कुटुंबात होत असलेल्या किरकोळ वादातून सासूची हत्या केल्याचं उघड झालंय. शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाच ते सहावेळा चाकूने वार करून सुनेने सासूला संपवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जालना पोलिसांनी आरोपी सुनेला परभणी येथून अटक करून जालन्यात आणलं आहे.

हत्येचा घटनाक्रम नेमका कसा?

सासू आणि सुनेचा काल मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून रात्री वाद झाला

यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घरातच पडलेल्या एका चाकूने सुनेने सासूच्या शरीरावर वेगळ्या ठिकाणी पाच ते सहावेळा वार करून संपवलं

हत्या केल्यानंतर आरोपी सून एक तास घरात बसून राहिली, नंतर सासूचा मृतदेह एका गोणीत टाकला

मृतदेह एका गोणीत भरल्यानंतर आरोपी सुनेने पायी जालना बस स्टॅण्ड गाठलं

बस स्टॅण्डहून रिक्षा करून आरोपी जालना रेल्वे स्टेशनला पोहोचली

सकाळी सहा वाजेच्या रेल्वेने आरोपी सून परभणीला रवाना झाली

परभणी रेल्वे स्टेशनहून आरोपी सून माहेरच्या घरी पोहोचताच जालना पोलिसांनी आरोपी सुनेला ताब्यात घेतलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT