Kalamb Crime : मनिषा बिडवे हत्या प्रकरण; आरोपींनी कुणाच्या सांगण्यावरुन महिलेला संपवलं? आरोपी नेमका काय करायचा?

Kalamb Women Murder News : कळंबमध्ये या महिलेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याचा धक्कादायक खुलासा काल करण्यात आला होता. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी या महिलेचा संबंध जोडला जात होता.

Dharashiv Kalamb woman killed case accused Rameshwar Bhosal
Dharashiv Kalamb woman killed case accused Rameshwar BhosalSaam Tv News
Published On

धाराशिव : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध अनैतिक संबंधाकडे वळवून हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होता. मात्र, काही दिवसांपूर्वी ज्या महिलेचा संबंध या प्रकरणाशी जोडला जात होता, त्या महिलेचा मृतदेह सहडलेल्या अवस्थेत कळंबमध्ये सापडला. या महिलेच्या मृतदेहासोबत आरोपी दोन रात्री त्याच खोलीत झोपले. मृतदेहासमोरच त्याने जेवण केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिल्यानंतर आज या दोन्ही आरोपींना कळंब सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून १० तारखेपर्यंत या आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

कळंबमध्ये या महिलेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याचा धक्कादायक खुलासा काल करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी या महिलेचा संबंध जोडला जात होता. मात्र, या महिलेची हत्या करून पसार झालेल्या दोन्ही आरोपींना पकडण्यात आलं आणि आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून हत्या केली का? याचा तपास सध्या कळंब पोलीस करत आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी कुठे कुठे फिरले, कोणाच्या संपर्कात आले, कोणत्या गाडीने फिरले याचा तपास अजून सुरु आहे. तसेच आरोपींचे फोन ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करणं गरजेचं असल्याचा युक्तीवाद आज कोर्टात सरकारी वकिलांकडून करण्यात आला. कळंब सत्र न्यायालयात न्यायाधीश रवींद्र बाटे यांनी दोन्ही आरोपींना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


Dharashiv Kalamb woman killed case accused Rameshwar Bhosal
Amravati : महसूल मंत्र्यांच्या नावाचे बनावट लेटरहेड व सही; अमरावती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

आरोपी रामेश्वर भोसले महादेव घुलेकडे ऊसतोडणीचं काम करायचा. कळंब येथील महिला त्रास देत असल्याचे रामेश्वर भोसले याने महादेव घुलेला आठ दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर रामेश्वर भोसलेने त्या महिलेची हत्या केल्याचं रामेश्वरच्या मित्राकडून महादेव घुलेला माहिती मिळाली. रामेश्वरने हत्या केलीय त्याला वाचवा, असं त्याचा मित्र फोन करून सांगायचा अशी माहिती महादेव घुले याने दिली. तसेच रामेश्वर भोसले टाकळी इथं काम करत असताना सुदर्शन घुलेच्या संपर्कात आला नसल्याचं महादेव घुले याचं मत आहे. महिलेचा खून केल्यानंतर आरोपी गोव्याला गेले आणि तिथून फोन केल्याची माहिती महादेव घुले याने दिली. महादेव घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या टाकळी गावचाच रहिवासी आहे. मात्,र सुदर्शन घुलेशी आपला काहीही संबंध नसल्याचं महादेव घुले याने सांगितलं आहे.


Dharashiv Kalamb woman killed case accused Rameshwar Bhosal
Pune Hit & Run Case : मॉर्निंग वॉक करताना पुण्यात तरुणाला उडवलं, आरोपी चालकाला काही तासात बेड्या; कारची नंबरप्लेट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com