दोघांचे भांडण तिसऱ्याचा खून ! Saam Tv
महाराष्ट्र

दोघांचे भांडण तिसऱ्याचा खून !

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून, जालन्याच्या भोकरदन शहराजवळील फत्तेपुर रोडवरील घटना

लक्ष्मण सोळुंके

जालना : दोन मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुण हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना रात्री व भोकरदन- फत्तेपूर रोडवरील महावितरण च्या सबस्टेशन जवळ घडली आहे. सागर भारत बदर ( २७, रा. वालसा खालसा ) असे खून झालेल्या हॉटेल चालक तरुणाचे नाव असून, त्याचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा-

सागर बदर हा त्यांचा मित्र कैलास गजानन फुके यांच्या लहान भावाच्या वाढदिवसासाठी फत्तेपूर ला गेला होता. वाढदिवस साजरा झाल्या नंतर कैलास फुके याला जुन्या वादातून योगेश पुंजाजी फुके यांचा वारंवार फोन येत होता, फोन वर तो आपला जुना वाद मिटवून टाकू असे सतत म्हणत होता. त्यासाठी तू फत्तेपूर रोडवरील २२० केव्ही केंद्राजवळ ये असे सांगत होता. त्यांचे वारंवार फोन येत असल्याने कैलास सागर ला घेऊन दुचाकीवरून केंद्राजवळ जाताच कैलास आणि योगेश यांच्यात वाद वाढला सागर आणि रस्त्यांनी जाणाऱ्या नागरिकांनी हा वाद मिटवला.

हे दोघे दुचाकीवरून निघाले असता योगेश ने धारदार हत्याराने सागरच्या पोटात वार करून त्याला गंभीर जखमी केल्याने सागर दुचाकीवरून खाली कोसळला, कैलाश आणि जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी सागरला भोकरदन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्याला जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, वाटेतच सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला, या प्रकरणी सागरच्या वडिलांच्या तक्रारी वरून आरोपी योगेश पुंजाजी फुके यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी योगेश फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT