Jalna Ambad road accident Saam TV News
महाराष्ट्र

Jalna : मध्यरात्री काळाचा घाला, अपघातात माय-लेकीचा जागेवरच मृत्यू, २ जण जखमी

Jalna Accident News : जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात,ट्रॅव्हल आणि टेम्पो ची समोरासमोर धडक,अपघातात 2 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे, जालना प्रतिनिधी

Jalna Ambad road accident : जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाला . ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मायलेकींचा दुर्देवी मृत्यू झाला आहेअंजना पुरुषोत्तम सापनर वय ३० व अनुसया पुरुषोत्तम सापनर वय १४ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली असं मयत मायलेकींची नावे आहेत. तरी अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी आहेत. तर अपघातामध्ये जवळपास सहा जण किरकोळ जखमी झाले आहे.बीड वरून जालना कडे येणारी ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झालाय.मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमीवर अंबड येथील शासकीय आणि जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

मध्यरात्री भीषण अपघात

जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर अंबड - वडीगोद्री रोडवर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी आहेत जखमींवर सध्या जालन्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहे..

मायलेकींच्या मृत्यूने हळहळ

जालन्यातील सुखापुरी फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकींचा मृत्यू झाला आहे.अंजना पुरुषोत्तम सापनर वय ३० आणि अनुसया पुरुषोत्तम सापनर वय १४ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली असं मयत मायलेकीचं नाव आहे. मायलेकीच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये एकच हळूहळू व्यक्त केली जात आहे.

अपघातात दोघे गंभीर जखमी तर सहा जण किरकोळ जखमी

अपघातामध्ये पुरुषोत्तम नाथराव सापनर वय ४० गंभीर जखमी असून कृष्णा पुरुषोत्तम सापनर वय १६ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली,बाळू शेळके वय ३५, सतीश लव्हटे  वय ३५ रा. तडेगाव ता. भोकरदन जि. जालना हे किरकोळ जखमी आहे. तर ट्रॅव्हल्स मधील विजय नेहारकर रा. परळी रामचंद्र फड कनेरवाडी, संदीप उमाजी शेप आणि यश फुलारे शेपवाडी असे जखमीचे नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT