EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Viksit Bharat Rozgar Yojana : EPFO अपडेटनुसार, पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना विकसित भारत रोजगार योजनेतून ₹15,000 पर्यंत लाभ मिळू शकतो.
Government Schemes
Government Schemessaam tv
Published On: 

EPFO Updates : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विसकित भारत रोजगार योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ₹15,000 पर्यंत आर्थिक लाभ मिळू शकतो. रोजगाराच्या संधी वाढवणं आणि तरुणांना आर्थिक आधार देणं हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे, दुसरा हप्ता मिळवण्यासाठी EPFO सदस्य पोर्टलवरच्या आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

दोन हप्त्यांमध्ये मिळणार, ₹15,000

तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर ही आर्थिक मदत तुम्हाला दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. पहिला हप्ता सलग सहा महिन्यांची नोकरी पूर्ण केल्यानंतर मिळण्याची तरतूद आहे. दुसरा हप्ता मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला EPFO सदस्य पोर्टलवर उपलब्ध असलेला आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली पात्रता तपासून योजनेच्या अटी समजून घेणं महत्त्वाचं आहे.

Government Schemes
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 कधी येणार?

कोणाला मिळू शकतो योजनेचा लाभ?

  • कर्मचारी पहिल्यांदाच औपचारिक नोकरीत रुजू झालेला असावा आणि यापूर्वी EPFO सदस्य नसावा.

  • संबंधित कर्मचाऱ्याचे EPFO मध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे.

  • मासिक वेतन ₹1 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

  • कर्मचारी भारतीय नागरिक असावा.

  • आधारशी जोडलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.

  • दुसऱ्या हप्त्यासाठी आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

Government Schemes
Horoscope : उद्यापासून या 4 राशींना धनलाभ होणार; मोठ्या समस्येतून होईल सुटका

कोणत्या कालावधीत नोकरी मिळालेली असावी?

दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२५ ते ७ जुलै २०२७ या कालावधीत नोकरी मिळवणाऱ्या आणि योजनेच्या पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार केला जाऊ शकतो.

पात्र कर्मचाऱ्यांनी EPFO सदस्य पोर्टलवर लॉगिन करून आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासंबंधीच्या सूचनांचं पालन करावे आणि बँक खातं व आधारविषयक तपशील योग्य असल्याची खात्री करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com