Curry Leaves Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचे पाणी; होतील 'हे' भन्नाट फायदे

Surabhi Jayashree Jagdish

पोषक घटक

कढीपत्ता केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवत नाही, तर त्यातून शरीराला काही पोषक घटकही मिळतात. त्यात जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे संतुलित आहारात कढीपत्त्याचा समावेश केल्याने शरीराला फायदा होतो.

Curry Leaves Water | saam tv

पचनाच्या त्रासापासून मिळू शकतो आराम

कढीपत्त्याचं पाणी पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करू शकते. पोटात गॅस होणं आणि पोट फुगण यांसारख्या त्रासांमध्ये कढीपत्त्याचा आहारात समावेश उपयोगी ठरू शकतो. सकाळी कढीपत्त्याचे पाणी प्यायल्याने काही लोकांना पचनाच्या तक्रारी कमी होण्यास मदत मिळू शकते.

Drinking Curry Leaves Water Daily | saam tv

रक्तातील साखर

रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवणं आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. कढीपत्त्यातील काही घटक शरीरातील साखरेच्या नियंत्रणाशी संबंधित प्रक्रियांना मदत करू शकतात. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी औषधांसोबतच योग्य आहार आणि नियमित व्यायामाकडेही लक्ष देणं गरजेचं

Curry Leaves for Digestion | saam tv

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएलचं प्रमाण वाढल्यास हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि कार्बाझोल अल्कलॉइड्ससारखे घटक शरीरातील पेशींचं ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

Curry Leaves for Hair Growth | saam tv

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम या दोन गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या आहेत. कढीपत्त्याचं पाणी कमी कॅलरी असलेलं पेय म्हणून रोजच्या आहारात घेता येतं. मात्र केवळ हे पाणी प्यायल्याने वजन कमी होत नाही.

Curry Leaves for Healthy Skin | saam tv

केस मजबूत होण्यास मदत

कढीपत्त्यात काही जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. जी केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. कढीपत्त्याचा वापर केसांसाठी तयार केल्या जाणाऱ्या तेलात आणि हेअर पॅकमध्येही केला जातो.

Curry Leaves Nutritional Value | saam tv

त्वचेची काळजी

कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींचं संरक्षण करण्यास मदत करतात. त्वचेवरील काळे डाग, कोरडेपणा आणि उन्हामुळे आलेला काळेपणा कमी करण्यासाठी योग्य त्वचा निगा आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण महत्त्वाचं असते.

Natural Antioxidant Foods | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Healthy Morning Drinks

Refrigerator placement: घरात भिंतीपासून किती अंतराच्या दूर ठेवला पाहिजे फ्रीज?

Refrigerator placement | saam tv
येथे क्लिक करा