Jalna Bus Accident News:  Saamtv
महाराष्ट्र

Jalna Bus Accident: जालन्यात मोठा अपघात! कारच्या धडकेनंतर प्रवाशांनी भरलेली बस उलटली; १० जण जखमी

Jalna Bus Accident News: जालना शहराजवळ सिंदखेडराजा चौफुली येथे बस आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे| जालना. ता. ३० जुलै २०२४

जालन्यामधून बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कारने बसला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला असून यामध्ये बसमधील १० जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना शहराजवळ सिंदखेडराजा चौफुली येथे बस आणि कारचा भीषण अपघात झाला. कारने धडक दिल्यानंतर बस पलटी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये 10 जण जखमी झालेत.जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

महाराष्ट्र परिवहन महामंडळाची ही बस हिंगोलीवरून पुण्याकडे निघाली होती. यावेळी सिंदखेडराजा चौफुलीजवळ पाठीमागून एका कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती बस रस्त्यावर उलटली. यामध्ये बसमधील ६ प्रवासी आणि कारमधील ४ जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या कारमधील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

SCROLL FOR NEXT