Jalna Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Accident News : जालन्यात विहिरीत कोसळली जीप, 7 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

Jalna News: जालन्यात टॅक्सी जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय शिंदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

जालन्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे टॅक्सी जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जण 6 जन जखमी झालेत.

या अपघात प्रल्हाद बिटले, (चनेगाव ता. बदनापूर), प्रल्हाद महाजन (चनेगाव), नारायण निहाळ, नंदा तायडे, रंजना कांबळे (खामखेडा ता भोकरदन), ताराबाई भगवान मालुसरे आणि चंद्रकला अंबादास घुगे (चनेगाव ता बदनापूर) यांचं निधन झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला असलेले वारकरी जालन्यात उतरले आणि या ठिकाणी त्यांनी टॅक्सी जीप केली. यावेळी जालना येथून राजूरकडे जाताना तुपेवाडी शिवारामध्ये समोरून दुचाकी सर आल्याने जीप चालकाचे नियंत्रण सुटून ही जीप थेट विहिरीत कोसळली.

यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यात सहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश मिळालं. मात्र या घटनेत 7 जणांचा बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेत चालक बाचावला असून त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना मोफत उपचार दिले जाणार जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT