जालना राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ एका चारचाकी काळी पिवळ्या जीपचा भीषण अपघात झाला आहे. जीप विहिरीत पडून ७ जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मतदीने बाहेर काढण्यात आले आहेत. वारकरी पंढरपूर वरून घरी जात असताना हा अपघात झाला. सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जीपमध्ये नेमके किती जण होते, याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच जालन्यातील चंदनझिरा पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे आणि अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेत आहेत.
अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केलं त्यामुळे ६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे प्रशासनाने म्हटले आहे.
अपघातात मृत झालेल्या वारकऱ्यांची नावं
प्रल्हाद बिटले- रा चनेगाव ता. बदनापूर.
प्रल्हाद महाजन -रा चनेगाव
नारायण निहाळ -रा चनेगाव
नंदा तायडे -रा चनेगाव
रंजना कांबळे -रा खामखेडा ता भोकरदन .
ताराबाई भगवान मालुसरे -रा तपोवन ता भोकरदन .
चंद्रकला अंबादास घुगे --रा चनेगाव ता बदनापूर.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला असलेले वारकरी जालन्यात उतरले आणि या ठिकाणी त्यांनी टॅक्सी जीप केली. जालन्यावरून राजुरकडे जाताना तुपेवाडी शिवारामध्ये दुचाकी समोर आल्याने जीप चालकाचं नियंत्रण सुटलं आणि जीप थेट विहिरीत कोसळली, यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत चालक बाचावला असून त्याची चौकशी होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.