Yawal News Saam tv
महाराष्ट्र

Yawal News : नाल्यात पडलेल्या बकरीला वाचविताना झाला घात; तरुणाचा गाळात बुडून मृत्यू

Jalgaon yawal News : नेहमीप्रमाणे जयेश शेळ्या चारण्यासाठी गेला होता. दरम्यान गावालगत असलेल्या नाल्याच्या काठावर सायंकाळी सातच्या सुमारास एका शेळीचा पाय घसरून ती नाल्यातील डबक्यात पडली

Rajesh Sonwane

यावल (जळगाव) : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गावालगतच्या नाल्यातील चिखलात शेळीला वाचविताना बुडून मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील कोरपावली येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेप्रकरणी यावल पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

यावल तालुक्यातील कोरपावली परिसरात सदरची घटना घडली असून यात जयेश संतोष महाजन (वय १८) असे मृताचे नाव आहे. जयेश महाजन हा दररोज शेळ्या चारण्यासाठी शेतशिवारात जात होता. नेहमीप्रमाणे जयेश हा रविवारी देखील शेळ्या चारण्यासाठी गेला होता. दरम्यान गावालगत असलेल्या नाल्याच्या काठावर सायंकाळी सातच्या सुमारास एका शेळीचा पाय घसरून ती नाल्यातील डबक्यात पडली. 

बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात पडला 

बकरी नाल्याच्या डबक्यात पडल्याचे दिसल्यानंतर तिला वाचविण्यासाठी जयशने प्रयत्न केला. मात्र, त्याचा तोल जाऊन तो सांडपाण्याच्या चिखलात पडला. यातून त्याला बाहेर निघता येणे शक्य न झाल्याने जयेशचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जयेशला काढण्यासाठी गावकऱ्यांनी बाहेर काढले. यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. 

कुटुंबावर दुःखाचा डोंगर 

जयेश याची घरातील आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. यामुळे तो शेळ्या चारून उदरनिर्वाह म्हणून कुटुंबाला हातभार लावत होता. मात्र त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या मागे वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार वसीम तडवी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT