Yawal Crime Saam tv
महाराष्ट्र

Yawal Crime : शेजाऱ्याचे भयानक कृत्य; फूस लावून बालकाचे अपहरण करत केली हत्या, गच्चीवरच मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

Jalgaon News : मुलगा घरी आला नसल्याने कुटुंब, शेजारी व नातेवाइकांनी बालकाचा रात्रभर शोध घेतला. मात्र, तो कोठेही आढळून आला नाही. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून बालकाचा शोध

Rajesh Sonwane

यावल (जळगाव) : शेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय बालकास फूस लावून अपहरण केले. यानंतर त्याची हत्या करत स्वत:च्या घरातील वरच्या माळ्यावर निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह अर्धवट जाळून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यावल शहरातील येथील बाबूजीपुरा भागात उघडकीस आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. 

जळगावच्या यावल शहरात उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेत शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास येथील बाबूजीपुरा भागातील एका सहावर्षीय बालकाचे शेजारीच राहत असलेला शेख शाहीद शेख बिस्मिल्ला याने फूस लावून अपहरण केले. मुलगा घरी आला नसल्याने कुटुंब, शेजारी व नातेवाइकांनी बालकाचा रात्रभर शोध घेतला. मात्र, तो कोठेही आढळून आला नाही. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

दरम्यान, पोलिसांकडून बालकाचा शोध सुरू असताना, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेख शाहीद याच्या घराच्या वरच्या माळ्यावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर एकच गोंधळ उडाला होता. तर घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला. 

संशयिताला घेतले ताब्यात 

परिसरात गोंधळ निर्माण झाल्याने दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. तर जमाव आक्रमक होत संशयिताला ताब्यात घेण्याची मागणी केली. बालकाच्या आजोबांच्या फिर्यादीवरून अपहरण व खून करणाऱ्या शेख शाहीद शेख बिस्मिल्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी संशयित शेख शाहीद शेख बिस्मिल्ला (वय २२) यास अटक केली. संशयित शेख शाहीद यास न्यायालयात हजर केले असता १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

Tuesday Horoscope : लक्ष्मीची विशेष कृपा होणार; ५ राशींच्या लोकांची भरभराट होईल, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Crime News: पंधरा वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर जडला मामीचा जीव; लग्नाला नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

Asrani: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे पूर्ण नाव माहितीये का?

SCROLL FOR NEXT