Mira Bhayndar : एकाच कुटुंबातील ६ जणांना विषबाधा; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Mira Bhayndar News : उलट्या, मळमळ आणि जुलाबाच्या त्रास जाणवू लागला होता. हा त्रास जाणविल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान उपचार सुरु असताना यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Mira Bhayndar News
Mira Bhayndar NewsSaam tv
Published On

मनोज तांबे 
मीरा भाईंदर
: घरी काही खाण्यात आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला त्रास जाणवू लागला. यानंतर रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा झाली असून यात एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मीरा भाईंदर मधील जय बजरंग नगर येथे घडली आहे. अन्य सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मीरा भाईंदरच्या जय बजरंग नगर परिसरातील रहिवासी मोर्या परिवाराला विषबाधा झाली आहे. मोर्या परिवाराने सर्वानी सोबत काहीतरी पदार्थ खाल्ला. यानंतर सर्वानाच त्रास जाणवू लागला होता. उलट्या, मळमळ आणि जुलाबाच्या त्रास जाणवू लागला होता. हा त्रास जाणविल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान उपचार सुरु असताना यात दिपाली मोर्या या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. 

Mira Bhayndar News
Risod News : तीन वर्षांपासून रस्त्याचे भिजत घोंगडे; चिखलमय रस्त्यात फसले खताचे ट्रॅक्टर, शेतकरी हतबल

दोघांची प्रकृती गंभीर 
दरम्यान रमेश मोर्या, नीलम मोर्या आणि राजकुमार मोर्या यांच्यावर सध्या मीरा भाईंदर मधील डॉ. भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चाहत मोर्या आणि अनामिका मोर्या यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासहित मुंबईच्या जे. जे. रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. या घटनेने कुटुंबावर मोठा आघात पोहचला असून परिसरात खळबळ उडाली आहे. 

Mira Bhayndar News
Jamner Accident : भरधाव डंपरने तरुणाला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा मृतदेहासह रास्ता रोको

फॉरेन्सिक टीमकडून तपासणी 
घटनेनंतर रुग्णालयात दाखल मोर्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस दाखल झाले. मात्र विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा तपास मीरा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com