Aadhar 
महाराष्ट्र

सेतू केंद्रावर नगरसेविकेच्‍या नावाचा बनावट शिक्‍का; दोघांना दिले पोलिसांच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नगरसेविकेच्या नावाचा बनावट शिक्का तयार करून आधार कार्ड अपडेट करणार्‍या दोघांना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. (jalgaon-women-corporator-name-fraud-stamp-use-setu-center-in-aadhar-updation)

जळगाव महापालिकेच्‍या महिला नगरसेविकेच्या नावाने बनावट स्टँप तयार करून सेतू कार्यालयात आधार कार्ड अपडेशन करण्यात येत होते. याबाबतची माहिती नगरसेवक प्रशांत नाईक यांना मिळाली होती. त्यांनी या प्रकरणाचा तपास करत आज आधार अपडेशनचे काम सुरू असलेल्‍या केंद्रावर धडक दिली. यावेळी हे काम करणार्‍या सेतूच्या दोन कर्मचार्‍यांना पोलीसांच्‍या ताब्यात दिले.

बनावट शिक्‍का वापरण्याचे गमक काय

दोन्ही कर्मचार्‍यांची पोलिस चौकशी करत असून त्‍यांच्‍या विरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. मात्र नगरसेविकेच्‍या नावाचा बनावट शिक्‍का वापरण्याचे नेमके काय कारण आहे. याचा शोध लावण्यात येणार आहे. मुळात हा गंभीर प्रकार असून यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

SCROLL FOR NEXT