अवलिया युवा उपसरपंच..ज्‍यांची गोरगरिबांसाठी अनोखी कामगिरी

अवलिया युवा उपसरपंच..ज्‍यांची गोरगरिबांसाठी अनोखी कामगिरी
उपसरपंच
उपसरपंचउपसरपंच
Published On

सुनील पाटील

चोपडा (जळगाव) : ‘जिसका कोई नही होता, उसका खुदा होता है यारो..! ओळींप्रमाणे वेले-आखतवाडे (ता. चोपडा) येथील युवा उपसरपंच दीपक सुनील पाटील हे दिव्यांग, विधवा, निराधार व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत असून, गोरगरिबांसाठी अनोखी कामगिरी करीत आहेत. (wele-village-upsarpanch-dipak-patil-help-poor-women-goverment-scheam)

निराधार, वृद्ध व्यक्ती, दिव्यांग शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला तसेच शेकडो नागरिकांना शासनाच्या विविध योजनांसह घरकुल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी स्वतःच्या खिशातील पदरमोड करून कागदपत्रांची जुळवाजुळव करून महसूलसह विविध विभागात प्रस्ताव तयार करून तो मंजूर होईपर्यंत तर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत प्रयत्न करणारे वेले (ता. चोपडा) येथील दीपक पाटील यांचे एमकॉमपर्यंत शिक्षण झाले आहे.

उपसरपंच
चिंतेचे ढग : बळीराजा धास्तावला; जिल्ह्यात पाऊस लांबल्‍याने बिकट समस्‍या

स्‍वतःचे मतदान नसलेल्‍या प्रभागातून विजयी

ग्रामपंचायत सदस्यापासून ते उपसरपंचापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. स्वतःचेही मतदान नसलेल्या प्रभागातून शेकडो महिलांनी स्वतःची पदरमोड करून या अवलियाला विजयी केले आहे. याचे खरे कारण म्हणजे महिलांसह गोरगरिबांना विविध योजनांचा लाभ मिळवून नागरिकांची केलेली कामे जमेची बाजू आहे.

गरीबांसाठी धडपड

शासनाच्यावतीने अनेक योजना चालविण्यात येत आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजना, निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या या योजनांचा लाभ दीपक पाटील यांनी प्रयत्न करून मिळवून देतो. त्याचे उतराई होण्यासाठी या महिलांनी स्वकष्ट घेत दीपकला सर्व मदत करून त्यांचे आशीर्वाद दिल्याने उपसरपंचपदापर्यंत मजल मारून आजही अनेक गोरगरिबांची सेवा करीत आहे.

जमनाबाई रामदास भिल या ८५ वर्षीय वयोवृद्ध गरीब महिलेला २००९ पासून इंदिरा गांधी योजनेचे अनुदान सुरू करून दिले होते. परंतु मागील तीन वर्षांपासून ते बंद झाले होते. ते सुरू केले. अशा अनेकांना मदतीची संधी मिळाल्याचे समाधान आहे.

- दीपक पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत वेले आखतवाडे (ता. चोपडा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com