Railway Coal Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Varangaon News: चालत्या मालगाडीतून फिल्मी स्टाईल कोळसा चोरी; दिपनगरचा सुरक्षा विभाग हतबल, पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल

चालत्या मालगाडीतून फिल्मी स्टाईल कोळसा चोरी; दिपनगरचा सुरक्षा विभाग हतबल, पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

वरणगाव (जळगाव) : विद्युत निर्मिती करीता लागणारा कोळसा वरणगाव व फुलगावमार्गे दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातमध्ये (Railway) रेल्वेने वाहतूक करून आणला जातो. मात्र प्रकल्पबाह्य भागात हाकेच्या अंतरापर्यंत फिल्मी स्टाईलने चालत्या मालगाडीवर चढून कोळसा चोरीच्या प्रकरणात वाढ होत आहे. दररोज लाखों रूपयांचा कोळसा चोरी होत आहे. दिपनगर प्रशासनाने सुरक्षेत वाढ केल्यावर सुद्धा चोऱ्या थांबत नाही. वरणगाव (Varangaon) पोलिसांत तीन संशयीतांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

दिपनगर औष्णीक विद्युत प्रकल्पात दररोज शेकडो टन कोळशाची मागणी असल्याने गेली कित्तेक वर्षापासुन दररोज वरणगाव, फुलगाव मार्गे रेल्वेने कोळसा आणला जात आहे. मात्र फुलगावमधील काही चोरट्यांनी रेल्वेने येणारा कोळसा चोरण्यासाठी ३०ते ४० लोकांची टोळी तयार केल्याची चर्चा आहे. या टोळीतील सर्व सराईत गुन्हेगार असुन यांच्‍यावर रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा विभागात विविध गुन्ह्यांच्या (Crime News) नोंदी आहेत.

ना कोणाला भिती

टोळीतील मंडळी गुन्हेगारी क्षेत्रात प्रख्यात असल्याने ते कोणाला मारायला व स्वतः मरायला सुध्दा घाबरत नाही. म्हणून दिपनगर प्रशासनाची कडक सुरक्षा असतांना देखील बिनधास्तपणे रेल्वेच्या मालगाडीवर चढून कोळशाची दिवसाढवळ्या चोरी करत असतात. त्यांना ना आरपीएफची भीती आहे, ना पोलिस व दिपनगरच्या सुरक्षा विभागाची भिती. त्यांची चोरीची शैली देखील कोणालाही पाहून आश्चर्य वाटेल. प्रकल्पाच्या २०० पावलांच्या अंतरावर या टोळ्यांमधील चोरटे चालत्या ट्रेनमधून कोळसा चोरण्यात पटाईत आहेत.

सापळा रचला, पाहून झाले पसार

दिपनगर प्रशासनाच्या सुरक्षा विभागातील सुरक्षा रक्षकांचा चोरट्यांवर कडक पहारा असतांना चोरट्यांनी निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये दिपनगर प्रशासनाचा कोळसा चोरी करून नेत असल्याची गोपनीय माहिती वरणगाव पोलिसांना मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कुमार आडसुळ यांनी ५ मार्चला पथक तयार करून फुलगाव जवळील सद्‌गुरु बैठक हॉलजवळ दुपारी दोन वाजता सापळा लाऊन होते. त्याच क्षणी दिपनगरकडून येणारे एक निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना पाहुन दुसऱ्या मार्गाने ट्रॅक्टर वळवून पळ काढला.

ट्रॅक्टरमध्ये रेल्वे वॅगनमधील चोरलेला कोळसा भरून पळून जात असलेल्या बापू बाविस्कर व जितू चंद्रकांत पाटील (दोन्ही राहणार फुलगाव) व एक अज्ञात यांना पोलिसांनी ओळखले. त्यांच्याविरुद्ध वरणगाव पोलिसांत या प्रकरणी औष्णिक विद्युत केंद्राचे सुरक्षा अधिकारी राजेश हरी तळेले यांच्या फिर्यादीवरून वरणगांव पोलीस स्टेशनला सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT